१५ ऑक्टोबर २०२६, पुणे - 'प्रक्रिया को-लर्निंग स्पेस फाऊंडेशन' आणि 'मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग' आयोजित वाचन प्रेरणा दिन - विषय: विज्ञानकथा
१५ ऑक्टोबर २०२६, पुणे - 'प्रक्रिया को-लर्निंग स्पेस फाऊंडेशन' आणि 'मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग' आयोजित वाचन प्रेरणा दिन - विषय: विज्ञानकथा
'आधुनिक ग्रंथप्रसारक', पुस्तक वाचनाचा वर्ल्ड रेकॉर्ड असलेले समीक्षक समीर गुधाटे यांच्या 'पुस्तकं आणि बरंच काही' पॉडकास्टवर माझी पुस्तकं व एकूण विज्ञानकथा या विषयावर गप्पा झाल्या. सौजन्य- मराठी मूड चॅनल.
पुस्तकचर्चा - सुबोध जावडेकर लिखित, साहित्य अकादेमी प्रकशित 'निवडक मराठी विज्ञानकथा'. आयोजक- साहित्य अकादेमी, बी. एन. बांदोडकर महाविद्यालय, मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग.
'पै फ्रेंड्स लायब्ररी' आणि 'अभिव्यक्ती फाउंडेशन' आयोजित 'डोंबिवलीच्या साहीत्यखुणा' या कार्यक्रमात डोंबिवलीतील ज्येष्ठ, मान्यवर लेखकांसोबत सहभागी व्हायची संधी मिळाली.
'अजेय' संस्थेतर्फे आयोजित १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाचनवेडे २०२६ या अनोख्या स्पर्धेत एक परीक्षक म्हणून योगदान दिलं. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणारी ही स्पर्धा ठाणे इथे पार पडली.
'साहित्य रंग' या लोकप्रिय ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल उत्तरा मोने, मिती ग्रुप टीम, मा. डॉ नीलम गोऱ्हे व प्रकाशक मित्र गीतेश शिंदे यांचे आभार!
विज्ञानकथा दिनाच्या पार्श्वभूमीवर २१ जुलै २०२६ रोजी वरळीच्या 'के बी पी हिंदुजा कॉलेज'च्या सुसज्ज लायब्ररीत विद्यार्थ्यांसोबत संवाद झाला. कवयित्री प्रा. ज्योती भारती यांनी माझी मुलाखत घेतली.
धन्यवाद ग्रंथालय विभाग, मराठी वाङ्मय मंडळ आणि प्रा. ज्योती भारती!
सुजीत सर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत; आणि लेखक, कवी आहेत. 'असरगंध' हा त्यांचा प्रकाशित झालेला कवितासंग्रह.
इचलकरंजीला त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलसाठी माझ्यासोबत छान पॉडकास्ट केला.
२८ डिसेंबर २०२५, दैनिक नवशक्ती
'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या विज्ञानकथा संग्रहाचे डॉ. संजय जोशी यांनी केलेले परीक्षण. धन्यवाद, डॉ. संजय जोशी, गीतेश शिंदे व संपादक मंडळ!
महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत, ठाणे वार्ता, महाराष्ट्र दिनमान
'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या विज्ञान कथासंग्रहाचे प्रकाशन ६ डिसेंबर २०२५ रोजी ठाण्यात मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह व ज्येष्ठ विज्ञान लेखक अ. पां. देशपांडे, ज्येष्ठ विज्ञान लेखक कॅप्टन सुनील सुळे व ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, लेखक डॉ. संजय जोशी यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध आर.जे., वृत्तनिवेदक मानसी आमडेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रकाशन सोहळ्याची महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत, ठाणे वार्ता, महाराष्ट्र दिनमान, या वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल पत्रकार मित्र व संपादकांचे मन:पूर्वक आभार!
'ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी'च्या 'शब्दांगण' या पुस्तकविषयक उपक्रमाच्या २४२व्या सत्रात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' ह्या पुस्तकाबद्दल आणि इतर कथा, वाचन, लेखनप्रवास याविषयी बोलता आलं. प्रश्नोत्तरांचा भाग उत्तम झाला.
८ ऑक्टोबर २०२३, लातूर
'कुमार साहित्य संमेलन' - लेखन कार्यशाळा आणि लेखक गप्पा अशा दोन सत्रांत लेखक म्हणून सहभाग नोंदवला. छात्र प्रबोधन आणि जनकल्याण निवासी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साध्य झाला. लातूर परिसरातील शाळांचे सुमारे ६५० विद्यार्थी या संमेलनात उपस्थित होते.
५ फेब्रुवारी २०२३, पुणे
'कुमार साहित्य संमेलनात' शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळा घेण्याची संधी मिळाली. छात्र प्रबोधन मासिक आणि पुणे नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन झालं. छात्र प्रबोधनचं हे ३०वं वर्ष आणि पुणे नगर वाचन मंदिराचं १७५वं!
१४ फेब्रुवारी २०२०, मुंबई
'लोकमान्य सेवा संघ, पारले'तर्फे झालेला कार्यक्रम. 'सी. म. जोशी दिलासा केंद्र'च्या आशा कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली आणि इतर पदाधिकाऱ्यांनी 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' संग्रहातील एका विज्ञानकथेचं अभिवाचन केलं.
१३ सप्टेंबर २०१९, डोंबिवली
'पै फ्रेंड्स लायब्ररी'चा 'फ्रेंड्स कट्टा' - 'आपला लेखन प्रवास' असा कट्ट्याचा विषय होता. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' पुस्तकातल्या कथांविषयी, कथा लेखनाविषयी बोलण्याची संधी मिळाली.
२२ जून २०१९, 'एफ एम गोल्ड' आकाशवाणी
एफ एम गोल्ड या आकाशवाणी वाहिनीवर 'युवातरंग' कार्यक्रमात अंजली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सर्जनप्रक्रिया, लेखनप्रवास, वाचनप्रवास अशा गोष्टींबद्दल गप्पा झाल्या. एका कथांशाचं अभिवाचन केलं.
१३ एप्रिल २०२९, डोंबिवली
'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केलेलं छोटेखानी मनोगत. 'फ्रेंड्स लायब्ररी पुस्तक आदान प्रदान महोत्सवा'त या विज्ञानकथा पुस्तकाचं प्रकाशन झालं. 'विज्ञानाचा उगम म्हणजे? विज्ञानाची ताकद कोणती?' असे मुद्दे यामध्ये मांडता आले.
७ नोव्हेंबर २०१८ , लोकसत्ता
पत्रकार भक्ती परब व दिशा खातू यांनी दैनिक लोकसत्तात 'दिवाळी अंक' या विषयाला धरून केलेल्या फिचर स्टोरीत मेनका दिवाळी अंकात आलेल्या 'चिमुरडी' या पारितोषिकप्राप्त कथेबद्दल आणि लेखनप्रवासाबद्दल सांगण्याची संधी मिळाली.