क्षितिज देसाई
लेखक । विज्ञानकथा व इतर
क्षितिज देसाई
लेखक । विज्ञानकथा व इतर
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून कथा प्रकाशित. वय सतरा असताना (सन २०१०) 'साप्ताहिक सकाळ'च्या महत्वाच्या कथास्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, ज्यात सुमारे १००० लेखक सहभागी होते.
प्रकाशित पुस्तके (विज्ञान कथासंग्रह)
१. सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस, २०१९, अक्षर मानव प्रकाशन
२. शीतपेटीतून जेव्हा जाग येते..., २०२५, सृजनसंवाद प्रकाशन
'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' या पुस्तकाला आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, मराठवाडा साहित्य परिषद, स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार, कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान असे 'सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे' एकूण ४ राज्यस्तरीय पुरस्कार व मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा सर्वोकृष्ट ललित कलाकृतीचा वा. अ. रेगे हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त.
डॉ. नलिनी गुजराथी संपादित 'छात्र प्रबोधन'मधील ५ लेखकांच्या विज्ञानकथांचा संग्रह 'सफर विज्ञानकथांची' या पुस्तकात समावेश. (२०१७) सोबतचे इतर मान्यवर लेखक: डॉ. जयंत नारळीकर, डॉ. संजय ढोले, गजानन क्षीरसागर, मुकुंद जोगळेकर.
विज्ञानकथे व्यतिरीक्त सामाजिक कथाही प्रकशित झाल्या आहेत. साप्ताहिक सकाळ, मेनका कथास्पर्धा, संवादसेतू कथास्पर्धा अशा स्पर्धांत पारितोषिके प्राप्त.
अनघा जलतरे व कल्याणी पाटील यांच्यातर्फे दोन कथांचे इंग्रजी अनुवाद प्रकाशित.
व्यक्तिगत
जन्म: डिसेंबर १९९३
शिक्षण: बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
व्यवसाय: खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर